Gopinath Munde यांच्या वारसांना संधी मिळाली,पण त्यांना महामंडळ निर्णाण करता आलं नाही-Dhananjay Munde

| Updated on: Apr 03, 2022 | 9:58 PM

गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर ऊसतोड मजुरांसाठी संघर्ष केला असे सांगताना,  त्यांच्या वारसदारांना संधी मिळाली पण त्यानाही हे महामंडळ निर्माण करता आलं नाही, असा टोला धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना लगावाला आहे

धनंजय मुंडे यांनी पुण्यात मेळाव्यात ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं पंकजा मुंडे यांचं नाव न घेता टीका केली आहे. आजपासून गोपीनाथ मुंडे यांच्या नावानं हे महामंडळ सुरु होत आहे. गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर ऊसतोड मजुरांसाठी संघर्ष केला असे सांगताना,  त्यांच्या वारसदारांना संधी मिळाली पण त्यानाही हे महामंडळ निर्माण करता आलं नाही, असा टोला धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना लगावाला आहे. पुण्यात आज हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवारांपासून अनेक बडे नेते उपस्थित होते. बीड जिल्हा हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, त्यांच्या कल्याणासाठी या महामंडळाचा मोठा फायदा होणार आहे. अजित पवार यांनीही यावेळी जोरदार फटकेबाजी केली.

Special Report | अवकाशातून आगीचे गोळे.. ते नक्की काय होतं? -Tv9
Special Report | ‘राज’कारणावर भाजकडून स्तुती, मविआकडून टीकास्त्र