Naresh Mhaske म्हणाताय, ‘टेंभीनाका दहीहंडीची पंढरी अन् गोविंदाच आमचा सेलिब्रिटी’
VIDEO | यंदा ठाणे शहरातील टेंभीनाक्याच्या दहीहंडी उत्सवात राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह नेते मंडळीदेखील हजेरी लावणार, शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी दिली माहिती
ठाणे, ७ सप्टेंबर २०२३ | स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांची मानाची दहीहंडी ओळख असलेल्या टेंभी नाक्याची दहीहंडी या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी गोविंदा पथक सकाळपासूनच हजेरी लावत आहेत. या दहीहंडी उत्सवात राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यंदा दहीहंडी उत्सवात नेते मंडळी सोबत हजेरी देखील लावणार असल्याची माहिती प्रवक्ते नरेश मस्के यांनी दिली. या दहीहंडीला नामवंत गायक, कलाकारांचे नृत्य आणि संगीतमय जल्लोष असणार आहे. टेंभीनाक्यावर येणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकांसाठी दुपारच्या जेवणाची सोय करण्यात येणार आहे. टेंभी नाक्याची दहीहंडी ही पंढरी असून या ठिकाणी येणारा प्रत्येक गोविंदा आमच्यासाठी सेलिब्रिटी आहे. तर त्यांच्या संपूर्ण सुरक्षेची काळजी घेतली असल्याचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सांगितले आहे.
Published on: Sep 07, 2023 02:49 PM