उद्धव ठाकरेंची कशावरून सटकली? ‘त्या’ वक्तव्यावरून एकनाथ शिंदेंनी लगावला खोचक टोला

| Updated on: May 05, 2024 | 12:36 PM

'आता तुमची पाळी, काय म्हणतात ते आली रे आली आता तुमची पाळी आली. आता तुम्ही सिंघम व्हायचं आणि म्हणायचं. आता माझी सटकली,', धाराशिवमध्ये प्रचारसभेमध्ये जनतेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधलाय. यावर शिंदे काय म्हणाले?

धाराशिवमध्ये प्रचारसभेमध्ये जनतेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधलाय. ‘इतर वेळेला क्षुल्लक वाटणाऱ्या या माणसांसमोर तुम्ही का झुकताय, मतांची भीक का मागताय, आता तुमची पाळी, काय म्हणतात ते आली रे आली आता तुमची पाळी आली. आता तुम्ही सिंघम व्हायचं आणि म्हणायचं. आता माझी सटकली, आता आम्ही तुम्हाला मत देणार नाही, आता माझी सटकली आणि आता तुम्हाला सटकवणार’, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिंदेंवर सडकून टीका केली होती. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना खोचक टोला लगावला आहे. ‘फेसबुक लाईव्ह करून सटकली का?’ असा सवाल करत शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केलाय.

Published on: May 05, 2024 12:36 PM
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या जाहीरसभांचा धडाका?
संताच्या ओव्या, अभंग अन् मोदी…, सोशल मीडियावरील फडणवीसांच्या अनोख्या प्रचाराची चर्चा