‘तू जिंदगी भर याद करेगा’, ठाकरे गट शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी, व्हाट्सॲप कॉल आला अन्…

| Updated on: Nov 21, 2024 | 1:37 PM

ठाकरे गट शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. व्हाट्सॲप कॉलवरून रणजित पाटील यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. मात्र कॉल करणारी व्यक्ती नेमकी कोण? हे अद्याप समोर आलेले नाही.

धाराशिवमधून मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गट शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. व्हाट्सॲप कॉलवरून रणजित पाटील यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणजित पाटील यांना व्हाट्सॲपवर कॉल करणारी व्यक्ती हिंदी भाषेतून संवाद साधत होती. यावेळी त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. ‘तू कायमचं लक्षात ठेवशील… जेवढं तुला हवेत उडाचयं आहे तवेढं उड पण अशा ठिकाणी गोळी मारेल की तू आयुष्यभर लक्षात ठेवशील, समजलं का?’ असं व्हाट्सॲप कॉलवर समोरील व्यक्त बोलत होता. रणजित पाटील यांना जीवे मारण्याची धमकी ही फोनवरून मिळाली आहे. ही जीवे मारण्याची धमकी व्हाट्सॲप कॉलद्वारे देण्यात आली आहे. परंडा पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रणजित पाटील हे चारचाकी वाहनाने प्रवास करत होते. परंडा ते वारदवाडी दरम्यान प्रवास करताना रणजित पाटील यांना हा जीवे मारण्याच्या धमकीचा कॉल आला होता. या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. मात्र कॉल करणारी व्यक्ती नेमकी कोण? हे अद्याप समोर आलेले नाही.

Published on: Nov 21, 2024 01:29 PM
Maharashtra Vidhan Sabha Election : राज्यात दिवसभरात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला मतदानाचा हक्क?
विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, भाजपचे वरिष्ठ नेते कोणाला साधणार संपर्क?