अमरावतीच्या निवडणुकीतही गाजला खोक्यांचा मुद्दा, आमदार लिंगाडे यांनी केला ‘हा’ मोठा गौप्यस्फोट
अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी लांबल्यानंतर लिंगाडेंचा गौप्यस्फोट, काय केला रणजीत पाटील यांच्यावर आरोप?
मुंबई : अमरावतीमधील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही खोक्यांचा मुद्दा गाजल्याचे समोर आले आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतममोजणीला उशीर झाला. ३० तासांनंतर या निवडणुकीचा निकाल समोर आला. यामध्ये भाजपचे उमेदवार रणजीत पाटील यांचा मोठ्या फरकाने पराभव करत महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे विजयी झाले. अमरावतीतील हा निकाल भाजपसाठी मोठा धक्का होता. यानंतर नवनिर्वाचित आमदार धीरज लिंगाडे यांनी रणजीत पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत मोठा गौप्यस्फोट केल्याचे समोर आले आहे. ‘माझी लीड कमी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी खोक्यांची ऑफर देण्यात आली’, असा आरोप अमतरावतीतील मजमोजणीला विलंब झाल्यानंतर रणजीत पाटील यांच्यावर धीरज लिंगाडे यांनी केला आहे. धीरज लिंगाडे हे नवखे उमेदवार होते. तर रणजित पाटील दोनदा निवडून आले होते. तिसऱ्यांदा निवडून आले असते तर त्यांची हॅट्ट्रीक झाली असती. मात्र, त्यांची ही संधी हुकली.