तापमान वाढलंय, ट्रान्सफॉर्मर ‘कुल’ राहण्यासाठी इथं थेट 106 कुलरच लावले
VIDEO | तापमान वाढलंय मनुष्य हैराण, पण इथं तर ट्रान्सफॉर्मर 'कुल' राहण्यासाठी लावले तब्बल 106 कुलर्स
धुळे : सध्या धुळ्यातील तापमान 43 अंशाच्या पुढे गेले आहे. वाढलेल्या तापमानाचा परिणाम सर्वसामान्यांवर होऊ लागला आहे. अनेक वेळा वीज वितरण कंपनी मार्फत वीज खंडित केली जात असते. त्यामुळे नागरिकांचा त्यावर रोष असतो. मात्र वीजपुरवठा करीत असताना उन्हाळ्यात विजेची मागणी वाढते त्यामुळे अनेकदा वीज पुरवठा खंडित होत असते. वाढलेल्या विजेच्या मागणीमुळे आणि तापमानामुळे ट्रांसफार्मर गरम होतात आणि तांत्रिक बिघाड होऊन वीज खंडित होताना दिसते . यावर उपाय म्हणून वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशन येथील ट्रान्सफार्मर थंड राहावे, तसेच त्यात कोणताही तांत्रिक बिघाड होऊ नये म्हणून ट्रान्सफॉर्मरजवळ कुलर लावण्यात आले आहेत. धुळे तालुक्यातील शहर आणि ग्रामीण भागात असलेल्या 36 ट्रान्सफॉर्मरला 106 कुलर लावण्यात आले आहेत. यामुळे या ट्रान्सफॉर्मरच्यावर पडणारा अधिकचा भार कमी होतो आणि ट्रान्सफार्मर थंड राहुन त्याचे तापमान संतुलित राहते. त्यामुळे कुठलीही तांत्रिक अडचण निर्माण होत नाही आणि वीजपुरवठा खंडित होत नाही यासाठी कुलर लावले असल्याची माहिती मिळतेय.