Dhule Laling Waterfall : धुळ्यातील लळींग येथील धबधबा कोसळण्यास सुरूवात, पर्यटकांचा ओघ सुरू

| Updated on: Jul 15, 2024 | 4:05 PM

यंदा थोड्याशा पावसामुळे आता लळींग धबधबा प्रवाहित झाल्याने पर्यटक आता लळींग कुरणांमध्ये गर्दी करू लागले आहेत. मात्र असं असलं तरी या ठिकाणी पर्यटकांसाठी चांगल्या सुविधा, रस्ते नाहीत, बसायला जागा नाही. त्याचबरोबर या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि स्वच्छता नसल्याने अनेक पर्यटकांची नाराजी

धुळे शहरापासून जवळच असलेल्या लळींग कुरणात असलेला धबधबा थोड्या पावसामुळेच प्रवाहित झाला आहे .अनेक पर्यटक या ठिकाणी भेट देऊ लागले आहेत. गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्याे हा धबधबा प्रवाहित झाला नव्हता. त्यामुळे पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र यंदा थोड्याशा पावसामुळे आता हा धबधबा प्रवाहित झाल्याने पर्यटक आता लळींग कुरणांमध्ये गर्दी करू लागले आहेत. मात्र असं असलं तरी या ठिकाणी पर्यटकांसाठी चांगल्या सुविधा, रस्ते नाहीत, बसायला जागा नाही. त्याचबरोबर या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि स्वच्छता नसल्याने अनेक पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली. लळींग हा भाग विकसित होऊ शकतो पर्यटक या ठिकाणी येऊ शकतात. मात्र सुविधा नसल्याने या ठिकाणी जास्त प्रमाणात पर्यटक येत नाहीत. अनेक पर्यटक हे आपला जीव धोक्यात घालून धबधब्याच्या वरच्या बाजूला असलेल्या नाल्यामधील पात्रात बिनधास्त वावरताना दिसतात. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षतेची ऐशी तैशी झाली आहे. त्यामुळे वनविभागाने सुरक्षा देखील पुरवावी, अशी मागणी पर्यटकांनी केली आहे.

Published on: Jul 15, 2024 04:05 PM
भुजबळ-पवारांच्या भेटीवर भाजप नेत्याची भुवया उंचवणारी प्रतिक्रिया, म्हणाले; गुप्त भेट काहीतरी…
Ajanta Caves Waterfall : ओसंडून वाहू लागला अजिंठा लेणीचा धबधबा; बघा नयनरम्य दृश्य