नक्कल पाहिली का नक्कल, उपमुख्यमंत्र्यांनी केलेली ?
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही आता आक्रमक झाले आहेत. शरद पवार राज ठाकरे यांना काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं तर महत्वाचं आहेच. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
नाशिक : रविवारी औरंगाबादेतील (Aurangabad)मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर पार पडलेल्या सभेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. सभेत राज ठाकरे यांच्या संपूर्ण भाषणातील बराच भाग हा शरद पवार यांच्यावरील टीकेचाच होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही आता आक्रमक झाले आहेत. शरद पवार राज ठाकरे यांना काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं तर महत्वाचं आहेच. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. अजितदादांनी राज ठाकरे यांची नक्कलही केलीय !