Ladki Bahin Yojana : छ. संभाजीनगरात लाडक्या बहिणी त्रस्त, अर्ज भरण्यासाठी आलेल्या महिलांचा खोळंबा, कारण काय?
लाडकी बहीण योजनेचा फॉर्म डिजिटल पद्धतीने भरण्याची व्यवस्थाही महिलांसाठी करण्यात आली आहे. तर लाडली बहीण योजनेचे नारी शक्ती ऍप सुरू कऱण्यात आले आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी आलेल्या महिला चांगल्याच हैराण झाल्या आहे.
राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यापासून राज्यातील काना-कोपऱ्यातील महिला या योजनेचा लाभ मिळावा यासाठी धडपड करत आहे. या योजनेनुसार महिलांना दर महिन्याला १५०० रूपये मिळणार आहे. या योजनेचा लभ मिळावा यासाठी राज्यभात महिलांची एकच झुंबड उडाल्याचे पाहायला मिळत आहे. लाडकी बहीण योजनेचा फॉर्म डिजिटल पद्धतीने भरण्याची व्यवस्थाही महिलांसाठी करण्यात आली आहे. तर लाडली बहीण योजनेचे नारी शक्ती ऍप सुरू कऱण्यात आले आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी आलेल्या महिला चांगल्याच हैराण झाल्या आहे. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरताना कुठे सर्व्हर डाऊन तर कुठे नारी शक्ती ॲप संथ गतीने सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अशा येणाऱ्या अडचणींमुळे अर्ज भरणाऱ्या लाडक्या बहिणी त्रस्त झाल्या आहेत. नाव नोंदणीसाठी बराच वेळ महिलांना ताटकळत रहावे लागत आहे. या तांत्रिक अडचणीमुळे बऱ्याच ठिकाणी महिलांना अर्ज भरण्यासाठी येत अडचणी आहेत.