एसटी कर्मचाऱ्यांनी शांत राहण्याचं Dilip Walse Patil यांचं आवाहन
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. सरकारने आधीच भूमिका स्पष्ट केली आहे. उगाच कुणाच्या भडकवल्यामुळे कामगारांनी टोकाची भूमिका घेऊ नये, असं आवाहन दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे.
मुंबई : दिलीप वळसे पाटील यांनी आज मीडियाशी संवाद साधला. कोर्टाने निर्णय दिला आहे. सरकारनेही विलीनीकरणाची मागणी वगळता सर्व मागण्या मंजूर केल्या आहेत. त्यामुळे सहकार्य करून त्यातून मार्ग काढला पाहिजे. एसटी कर्मचाऱ्यांनी शांतता ठेवावी. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. सरकारने आधीच भूमिका स्पष्ट केली आहे. उगाच कुणाच्या भडकवल्यामुळे कामगारांनी टोकाची भूमिका घेऊ नये, असं आवाहन दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे.