VIDEO : Pune | पुण्यातील DCP ची ऑडिओ क्लिप प्रकरणी गृहमंत्री वळसे-पाटलांकडून चौकशीचे आदेश
डीसीपी मॅडमच्या या कारभाराला वैतागलेल्या कर्मचाऱ्यांनी थेट पोलीस महासंचालकांनाच पत्र लिहिलं होत. आता यासर्व प्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
पुण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्याचं फोनवरील संभाषण चांगलंच व्हायरल झालं आहे. पुण्यातील डीसीपी मॅडमला एसपी हॉटेलची बिर्याणी हवी आहे, तीही मोफत! डीसीपी मॅडमची ही फर्माईश आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय. डीसीपी मॅडमच्या या कारभाराला वैतागलेल्या कर्मचाऱ्यांनी थेट पोलीस महासंचालकांनाच पत्र लिहिलं होत. आता यासर्व प्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. जवळपास 5 मिनिटाची ही ऑडिओ क्लिप आहे. त्यात डीसीपी मॅडम मटण बिर्याणी, प्रॉन्स आणि अजून एका नॉन व्हेज भाजीची ऑर्डर द्यायला आपल्या कर्मचाऱ्याला सांगत आहेत.