दिपाली सय्यद यांचा संजय राऊत यांच्यावर निशाणा; म्हणाल्या, ‘राऊतांना डॉक्टरची…’

| Updated on: Jun 06, 2023 | 3:35 PM

VIDEO | 'डॉ. श्रीकांत शिंदे यांचं नाव ऐकल्यानंतर....', दिपाली सय्यद यांचा संजय राऊत यांना जोरदार टोला

मुंबई : संजय राऊत यांना माध्यमांनी शिंदे गटाच्या नेत्यांवर प्रश्न विचारला असता त्यांच्यावर बोलण्यापूर्वी संजय राऊत थुंकल्याचा प्रकार पाहायला मिळाला. यावरून राजकीय वर्तुळात थुकण्यावरून नवा वाद गेल्या दोन दिवसांपासून सुरू असल्याचे पाहायला मिळाला होता. प्रत्येकानं तारतम्य ठेऊन वागावं असा सल्ला अजित पवार यांनी राऊतांना दिला. यानंतर ‘धरणामध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं. संयम तर राखला पाहिजे सर्वांनी बरोबर आहे. पण ज्याचं जळतं त्याला कळतं. आम्ही भोगतो आहोत’, अशा शब्दात संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. दरम्यान, यावर दिपाली सय्यद यांनी देखील भाष्य केले आहे. संजय राऊत यांना डॉक्टरची गरज असल्याचे म्हणत त्यांनी राऊतांवर जोरदार निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. डॉ. श्रीकांत शिंदे यांचं नाव ऐकताच त्यांनी ती कृती केली त्यामुळे त्याच डॉक्टराने त्यांना डॉक्टरकडे घेऊन जावं, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

Published on: Jun 06, 2023 03:35 PM
टक्केवारीच्या आरोपानंतर ठाकरे गटाच्या नेत्यानं भुमरे यांना पुन्हा डिवचलं; म्हणाला, ‘कोण भुमरे?’ ‘टिनपाट माणूस ..’
रामदास आठवले यांच्या भाजपकडे ‘या’ तीन मोठ्या मागण्या, वक्तव्याची होतेय चर्चां