गुढीपाडव्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांना थेट पदस्पर्श दर्शन

| Updated on: Apr 02, 2022 | 9:44 AM

कोरोनाच्या काळात दोन वर्षात विठ्ठल रुक्मिणी मंदिरातलं पददर्शन बंद करण्यात आलं होतं. ते आजपासून सुरू होत आहे. त्यामुळे दर्शन घेण्यास आलेल्या भाविकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.

कोरोनाच्या काळात दोन वर्षात विठ्ठल रुक्मिणी मंदिरातलं पददर्शन बंद करण्यात आलं होतं. ते आजपासून सुरू होत आहे. त्यामुळे दर्शन घेण्यास आलेल्या भाविकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. भाविक रांगेत उभे राहून पददर्शन घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज वारकऱ्यांसाठी दिवाळीच्या सणापेक्षाही मोठा सण आहे. मंदीर समिती ही वारकऱ्यांसाठी आणि भाविकांसाठी सुसज्ज आहे. आज येणाऱ्या वारकऱ्यांचं गुलाब वृष्टी करून साजरी केली. हिंदु धर्मीयांसाठी हा खूप मोठा सण आहे. हिंदू वारकऱ्यांसाठी आज व्यवस्थित व्यवस्था केली आहे. खूप मोठी रांग सध्या दर्शनासाठी आहे. अनेक लोकांनी ऑनलाईन बुकींग केलं आहे. सर्व लोकांना आवाहन केलं आहे की, सॅनिटाईजचा वापर करा, मास्क वापरा, सामाजिक अंतर पाळा, शासनाने घेतलेल्या सगळ्या निर्णयाचं आम्ही तंतोतंत पालन करतो अशी माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.

तुळजाभवानी मंदिरात गुढीपाडव्यानिमित्त उभारली गुढी, नववर्षाचं जोरदार स्वागत
पंच Prabhakar Sail चा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची माहिती