Nagpur : आपला भिडू, बच्चू कडू… दिव्यांग तरूणाच्या भेटीने बच्चू भाऊ भारावले
अपघातग्रस्त बच्चू कडूंची दिव्यांग तरूणाने भेट घेतल्यानंतर बच्चू कडू भारवून गेले आणि त्यांनी दिव्यांग तरूणासह झालेल्या संवादाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
गेल्या तीन दिवसांपूर्वी प्रहार संघटनेचे नेते, माजी मंत्री बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे. अमरावतीत रस्ता ओलांडताना दुचाकीने जोरदार धडक दिल्याने बच्चू कडू यांच्या डोक्याला, हाता-पायाला जबर मार लागला आहे. त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्रावही झाला आहे. मात्र, सुदैवाने बच्चू कडू या अपघातातून बचावले आहेत. यानंतर त्यांना अमरावतीतून नागपुरातील एका रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, नागपुरात बच्चू कडू यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांच्या भेटीला दिव्यांग तरूण आल्याचे पाहायला मिळाले. अपघातग्रस्त बच्चू कडूंची दिव्यांगाने भेट घेतल्यानंतर बच्चू कडूदेखील भारवून गेले. सागर मेश्राम असे या तरूणाचे नाव असून बच्चू कडू यांनी या तरूणासह झालेल्या भेटीचा आणि संवादाचा व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरतोय.
Published on: Jan 14, 2023 08:38 AM