Mumbai | टास्क फोर्स आणि मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे गोविंदा पथकांची निराशा
मुंबईकरांचा लाडका सण असणाऱ्या दहीहंडी सण साजरी करण्यावरही यंदा बंदी घातली आहे. मात्र टास्क फोर्स आणि मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे दहीहंडी मंडळांची निराशा झाली आहे.
मुंबई : मागील वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे सर्वच सण साजरे करण्यावर निर्बंध आले आहेत. यंदाही हे निर्बंध कायम आहेत. काही गोष्टी सुरु झाल्या असल्यातरी निर्बंध अजूनही कायम आहेत. दरम्यान मुंबईकरांचा लाडका सण असणाऱ्या दहीहंडी सण साजरी करण्यावरही यंदा बंदी घातली आहे. मात्र टास्क फोर्स आणि मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे दहीहंडी मंडळांची निराशा झाली आहे. भाजप म्हणत आहे की आम्ही आंदोलन करू पण उत्सवाचं राजकारण होऊ नये अशी आपली भावना असल्याचे गोविंदा पथकांनी व्यक्त केली आहे. आम्हाला आमच्या जागेवरची मानाची दहीहंडी फोडण्यास परवानगी मिळावी. कोविड 19 संसर्गाची जाणीव ठेवूनच सुरक्षित दहीहंडी उत्सव आम्हाला आमच्या जागेवरच करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही दहीहंडी मंडळाने केली आहे.