‘माझ्या पत्नीला ब्लॅकमेल केलं आणि …’, देवेंद्र फडणवीस यांनी काय केला खुलासा?
VIDEO | अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करणाऱ्या फॅशन डिझायनरविरोधात गुन्हा दाखल, फसवणारी तरुणी उल्हासगनरमधून ताब्यात
मुंबई : अमृता फडणवीस यांना धमकी आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणाचे विधानसभेतही उमटले. यानंतर या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा केला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माझ्या पत्नीने या प्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. तिच्यावर दबाव आणून माझ्या माध्य्मातून काम करून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. आधी पैशाची ऑफर दिली. नंतर ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अनिल जयसिंघांनी नावाचा एक व्यक्ती गेल्या चार ते पाच वर्षापासून फरार आहे. अनिल जयसिंघांनी हा एक बूकी आहे. त्याच्यावर 14 ते 15 गुन्हे आहेत. त्याची एक मुलगी अनिक्षा हुशार आणि शिकलेली आहे. ही मुलगी 2015-16च्या दरम्यान अमृताला भेटत होती. नंतर तिचं येणं बंद झालं. अचानक 2021मध्ये या मुलीनं माझ्या पत्नीला भेटणं सुरू केलं, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. बघा आणखी काय दिली उपमुख्यमंत्र्यांनी माहिती…