‘हम-हम पाच है… ‘, कर्जत-जामखेड मतदारसंघात निनावी बॅनरची का होतेय चर्चा?

| Updated on: Oct 01, 2024 | 3:23 PM

कर्जत जामखेड मतदारसंघात अनोखे बॅंनर्स लागले आहे. या बॅनर्सवर हम पाच पाच है.. असा आशय लिहिला आहे. यावर महायुतीच्या चिन्हासोबत ठाकरे गटाची मशाल आणि काँग्रेसच्या पंजाचा पण फोटो आहे. सध्या निनावी बॅनरमुळे मतदारसंघात चर्चा सुरू आहे.

Follow us on

गेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिण अहमदनगर लोकसभेत भाजपाला दारूण पराभव पत्करावा लागला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांच्याकडून हा पराभव पत्करावा लागला. तर दक्षिण अहमदनगर लोकसभेत येणाऱ्या कर्जत-जामखेड विधानसभेचे आमदार रोहित पवार यांनी महायुतीचा पराभव करण्यासाठी प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले. आता विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि अजित पवार यांच्याकडून रोहित पवार यांना टार्गेट केले जाण्याची शक्यता आहे. अशातच आता कर्जत जामखेड मतदारसंघात अनोखे बॅंनर्स लागल्याचे पाहायला मिळत आहे. या बॅनर्सवर हम साथ साथ हैं हम पाच पाच है असा आशय दिसतोय. महायुतीच्या चिन्हासोबत ठाकरे गटाची मशाल आणि काँग्रेसच्या पंजाचा पण फोटो दिसतोय. लावलेल्या बॅनर्समुळे कर्जत जामखेड मतदारसंघात चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, कर्जत जामखेड मतदारसंघात लागलेल्या या निनावी बॅनरमुळे मतदारसंघात चर्चा सुरू आहे.