लोकं मला नोट पण देतात अन् वोट पण… निलेश लंकेंच्या मिश्किल वक्तव्याची चर्चा
"लोग मेरे को नोट भी देते और वोट भी देते" असं म्हणत महाविकास आघाडीचे नगर दक्षिणचे उमेदवार निलेश लंके यांनी खिशातून 500 आणि 100 ची नोट काढून आपल्याला एका लहान मुलीने खाऊसाठी जमा केलेले शंभर रुपये आणि एका शेतात काम करणाऱ्या महिलेने 500 रुपये निवडणुकीसाठी मदत दिल्याचे म्हटले आहे
अहमदनगरला निलेश लंके यांच्या प्रचारासाठी आमदार रोहित पवार मैदानात उतरले आहे. तर “लोग मेरे को नोट भी देते और वोट भी देते” असं म्हणत महाविकास आघाडीचे नगर दक्षिणचे उमेदवार निलेश लंके यांनी खिशातून 500 आणि 100 ची नोट काढून आपल्याला एका लहान मुलीने खाऊसाठी जमा केलेले शंभर रुपये आणि एका शेतात काम करणाऱ्या महिलेने 500 रुपये निवडणुकीसाठी मदत दिल्याचे म्हटले आहे. अहमदनगरला माहीजळगाव येथे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांची स्वाभिमान जनसंवाद यात्रा गेली असता तेथे देखील एका शेतकऱ्याने त्यांना आर्थिक मदत दिली आहे. स्वाभिमान जनसंवाद यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असून लोक भरभरुन प्रेम देत असल्याचे निलेश लंके यांनी म्हंटले. प्रत्येक सभेत आपल्याला आर्थिक मदत मिळत असल्याचे म्हणत शेतकरी कांद्याची पट्टी, सेवा निवृत्त शिक्षकाने एक महिन्याची पेन्शन दिल्याचा किस्सा लंके यांनी सांगितला… यावेळी त्यांनी खिशातुन 100 आणि 500 नोट काढून दाखवली.