WITT Global Summit : ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’मध्ये Not An ERA Of War विषयावर सखोल चर्चा, भारताची भूमिका काय?
WITT Global Summit च्या दुसऱ्या दिवसाच्या सत्रात 'नॉट एन एरा ऑफ वॉर' या विषयावर चर्चा झाली आहे. या सत्रात इंडिया एज ए ग्लोबल पीस केटालिस्ट सुरक्षा तज्ञ वेलिना त्चाकारोवा, संयुक्त राष्ट्रातील भारताचे माजी स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन आणि मालदीवच्या माजी संरक्षण मंत्री मारिया दीदी हे सहभागी झाले होते.
नवी दिल्ली | 26 February 2024 : TV9 नेटवर्कच्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’चा दुसरा दिवस सुरू झाला आहे. पहिल्या दिवसाच्या सत्रांप्रमाणे दुसऱ्या दिवशीही भरघोस प्रतिसाद मिळतांना दिसतोय. दरम्यान, या दुसऱ्या दिवसाच्या सत्रात ‘नॉट एन एरा ऑफ वॉर’ या विषयावर चर्चा झाली आहे. या सत्रात इंडिया एज ए ग्लोबल पीस केटालिस्ट सुरक्षा तज्ञ वेलिना त्चाकारोवा, संयुक्त राष्ट्रातील भारताचे माजी स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन आणि मालदीवच्या माजी संरक्षण मंत्री मारिया दीदी हे सहभागी झाले होते. आजचा ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ ग्लोबल समिटचा दुसरा दिवस आहे. यादरम्यान इंडिया एज ए ग्लोबल पीस केटालिस्ट सुरक्षा तज्ञ वेलिना त्चाकारोवा, संयुक्त राष्ट्रातील भारताचे माजी स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन आणि मालदीवच्या माजी संरक्षण मंत्री मारिया दीदी यांनी ‘नॉट एन एरा ऑफ वॉर’ या विषयावर भाषण केले. वेलिना त्चाकारोवा म्हणाल्या की, हा शांततेचा काळ आहे आणि त्यात भारताची भूमिका महत्त्वाची आहे. जगात शांतता राखण्यासाठी भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. त्याचवेळी मालदीवच्या माजी संरक्षण मंत्री मारिया दीदी भारत आणि मालदीवमधील संबंधांवरून आपल्या सरकारवर भडकल्याचे पाहायला मिळाले.