Nawab Malik राजीनामा देण्याची शक्यता , राजीनामा दिल्यानंतर खातं कोणाकडे देणार त्यावर चर्चा

Nawab Malik राजीनामा देण्याची शक्यता , राजीनामा दिल्यानंतर खातं कोणाकडे देणार त्यावर चर्चा

| Updated on: Feb 23, 2022 | 7:27 PM

ज्या ज्या मंत्र्यांवर आरोप होऊन अटक होईल त्या सगळ्यांना राजीनामा द्यावा लागेल. अनेक मंत्री, नेते यांच्यावर गंभीर आरोप आहेत.असा टोलाही त्यांनी लगावला आहे. त्यानंतर महाविकास आघाडीच्या गोटातील हलचालीही वाढल्या आहेत. जर मलिकांना राजीनामा द्यावा लागला तर त्यांच्या खात्याची जबाबदारी कुणाकडे दिली जाणार? असा सवालही राजकीय वर्तुळात विचारण्यात येत आहे.

मुंबई : ईडीने (ED) नवाब मलिक (Nawab Malik) यांना अटक केल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र झाली आहे. नवाब मलिक यांना ed ने अटक केलायंनातर त्यांना केबिनेट मंत्री राहण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तातडीने त्यांचा राजीनामा घेतील. अन्यथा आम्हाला आंदोलन करावं लागेल, असा थेट इशारा चंद्रकांत पाटलांनी दिला आहे. ज्या ज्या मंत्र्यांवर आरोप होऊन अटक होईल त्या सगळ्यांना राजीनामा द्यावा लागेल. अनेक मंत्री, नेते यांच्यावर गंभीर आरोप आहेत.असा टोलाही त्यांनी लगावला आहे. त्यानंतर महाविकास आघाडीच्या गोटातील हलचालीही वाढल्या आहेत. जर मलिकांना राजीनामा द्यावा लागला तर त्यांच्या खात्याची जबाबदारी कुणाकडे दिली जाणार? असा सवालही राजकीय वर्तुळात विचारण्यात येत आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे असे प्रमुख नेते उपस्थित आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत. मलिकांच्या खात्यासाठी राष्ट्रवादीकडून दोन नावं चर्चेत आहेत.

Mumbai | Ajit Pawar, Dhananjay Munde, Hasan Mushrif सिल्व्हर ओकवर दाखल
Nawab Malik यांचा D गॅंगशी काहीही संबध नाही – Adv . Amit Desai