सत्तेत समील होण्यापूर्वी दादांचं वेशांतर अन् नावात बदल, दिल्लीत 10 गुप्त बैठका; विरोधकांचा सरकारला घेराव
नाव बदलून जर अजित पवार दिल्लीत अमित शहा यांना भेटण्यास जात होते, तेव्हा सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर होती का? कोणीही नाव बदलून प्रवास करत असताना यंत्रणा झोपलेली असते का? असा आरोपच विरोधकांनी केलाय. अजित पवारांचा प्रवास याबदद्ल अनेक गुपीतं उलगडली आहेत. बघा स्पेशल रिपोर्ट
अजित पवारांच्या वेशांतरावरून राजकीय वाद पेटला आहे. त्यात नाव बदलून जर अजित पवार दिल्लीत अमित शहा यांना भेटण्यास जात होते, तेव्हा सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर होती का? कोणीही नाव बदलून प्रवास करत असताना यंत्रणा झोपलेली असते का? असा आरोपच विरोधकांनी केलाय. अजित पवार यांच्या पेहरावावरून विरोधकांनी सुरक्षेबाबत सरकारला घेराव घालण्यास सुरूवात केली आहे. सत्तेत जाण्यापूर्वी दिल्लीत आपण अमित शाह यांच्यासोबत कशा गुप्त बैठका केल्यात? नाव बदलून प्रवास कसा केला? याची माहितीच अजित पवार यांनी स्वतः पत्रकारांना दिली. त्यानंतर अजित पवार यांनी केलेल्या नावात बदलाचा मुद्दा आता वादात आला आहे. गेल्या शनिवारी अजित पवारांनी दिल्लीत पत्रकारांशी गप्पा मारल्या. त्यावेळी भाजप सोबत सत्तेत समील होण्यापूर्वी अजित पवारांच्या अमित शहांसोबत १० गुप्त बैठका झाल्यात. यावेळी करण्यात आलेल्या अजित पवारांचा प्रवास याबदद्ल अनेक गुपीतं उलगडली आहेत. बघा स्पेशल रिपोर्ट