Disha Salian Case : दिशा सालियनच्या वडिलांचे याचिकेतील गंभीर आरोप काय? कोण येऊ शकतं गोत्यात?

| Updated on: Mar 20, 2025 | 11:12 AM

दिशाचा सामूहिक बलात्कार करून निर्गुण हत्या केल्याचा आरोप आहे आणि सीबीआय चौकशीची मागणी करत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास समीर वानखेडेसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली करण्याची याचिकेतून मागणी आहे.

८ जून २०२० रोजी दिशा सालियनचा इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. दिशा सालियन ही अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर होती. तर १४ जून २०२० रोजी सुशांत सिंह राजपूताही मृत्यू झाला होता. दरम्यान. दिशा सालियानची ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप भाजपचे मंत्री नितेश राणे आणि नारायण राणे यांनी केला होता. तर आदित्य ठाकरेंचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोपही राणे कुटुंबीयांनी वेळोवेळी केला होता. मात्र आता या प्रकरणासंदर्भात दिशा सालियनच्या कुटुंबीयांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टामध्ये धाव घेतली आहे. सामूहिक बलात्कार करून दिशाची हत्या केल्याचा कुटुंबाचा आरोप आहे. आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची याचिकेतून मागणी करण्यात आली आहे. यासह सीबीआय चौकशीची देखील मागणी करण्यात आली आहे. किशोरी पेटणेकरांनी सुरुवातीला दिशाभूल करत दबाव टाकल्याचा आरोप देखील या याचिकेतून करण्यात आला आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नव्याने चौकशीसाठी वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे आणि लवकरच सुनावणी अपेक्षित आहे.

Published on: Mar 20, 2025 11:09 AM
भाजपची सत्ता राज्यासह केंद्रात असूनही औरंगजेबाची कबर का हटवली जात नाही? कबरीचं संवर्धन सरकार काढेल?
Nagpur Violence : नागपूर राड्यातील आरोपी फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा, पोलीस तपासातून खळबळजनक माहिती उघड