Disha Salian : दिशाच्या शरिरावरील ‘त्या’ जखमा नेमक्या कोणत्या? पोस्टमॉर्टेम रिपोर्टनंतर आरोपांची ‘दिशा’ बदलली?
दिशा सालियांचा मृत्यू लैंगिक अत्याचारामुळे नाही तर अनेक फ्रॅक्चरमुळे झाल्याचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला. मात्र हा रिपोर्टच खोटा असल्याचा दावा आता दिशा सालियांचे वकील करतायत.
दिशा सालियनवर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचा रिपोर्ट समोर आल्यानंतर या वादाला नव वळण मिळालं. मागच्या पाच वर्षापासून काही भाजप नेते बलात्कारानंतर दिशाचा मृत्यू झाल्याचा दावा करतायत. मात्र पोस्टमार्टेममध्ये दिशाचा मृत्यू अनेक फ्रॅक्चरमुळे झाल्याचं समोर आलं आहे. एक गट दिशाची हत्या झाल्याचा दावा करतोय. तर दुसऱ्या गटाचं मत आहे की दिशानं चौदाव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. दरम्यान पाच वर्षापूर्वी आपल्या मुलीने आत्महत्या केल्याचं सांगणाऱ्या तिच्या आईवडिलांनी आता मुलीच्या हत्येचा दावा कसा काय केलाय यावरून त्यांच्या नार्को टेस्टची मागणी करण्यात येत आहे. तर मी नार्को टेस्टला तयार आहे पण आरोपीची सुद्धा नार्को टेस्ट व्हावी, अशी मागणी दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी केली आहे. दिशा सालियनच्या मृत्यूच्या प्रकरणी विरोधाभासी माहिती समोर येत आहे. पोस्टमॉर्टेम अहवालानुसार, दिशा सालियनचा मृत्यू अनेक फ्रॅक्चरमुळे झाला, लैंगिक अत्याचाराने नाही. परंतु, दिशाच्या वकिलांनी या अहवालाला आव्हान दिले आहे आणि तो खोटा असल्याचा दावा केला आहे. काही भाजप नेते गेल्या पाच वर्षांपासून तिचा मृत्यू बलात्कारानंतर झाल्याचा दावा करत आहेत. तथापि, पोस्टमॉर्टेममध्ये हे सिद्ध झालेले नाही. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट