माढ्यात मोहिते-निंबाळकर अडले? रावेरमध्ये जावळे रूसले? भाजपच्या तिकीट वाटपामुळे नाराजीचा सूर
रावेर मतदारसंघात भाजपने रक्षा खडसे यांना तिकीट दिल्याने इच्छुक उमेदवार अमोल जावळे हे नाराज असून यांचे समर्थक राजीनामे देण्याचा इशारा दिला आहे. तर माढामध्ये नाईक-निंबाळकर यांना तिकीट दिल्याने मोहितेंच्या समर्थकांची नाराजी
मुंबई, १६ मार्च २०२४ : म्हाडा आणि रावेर या दोन्ही लोकसभेत भाजपकडून तिकीटासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांची नाराजी समोर येत आहे. काही ठिकाणी समर्थकांनी राजीनामे देत दबावतंत्राचा वापरही केलाय. रावेर मतदारसंघात भाजपने रक्षा खडसे यांना तिकीट दिल्याने इच्छुक उमेदवार अमोल जावळे हे नाराज असून यांचे समर्थक राजीनामे देण्याचा इशारा दिला आहे. तर माढामध्ये नाईक-निंबाळकर यांना तिकीट दिल्याने मोहितेंच्या समर्थकांनी आपली नाराजी व्यक्त करत राजीनामे दिलेत. धक्कातंत्रासाठी ओळखल्या जाणाऱ्या भाजपने यंदा महाराष्ट्रात तिकीट वाटपात फार मोठे धक्के दिले नाही. काही अपवाद वगळता काही खासदारांना पुन्हा संधी दिली. त्यावरून इच्छुक उमेदवार समर्थकांच्या माध्यमांतून दबाव तंत्र वापरतांना दिसताय. रावेर भाजपचे माजी खासदार हरीभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे यांना यंदा तिकीटाची आशा होती. मात्र रक्षा खडसे यांना तिकीट दिल्याने जावळे यांचे समर्थक नाराज झाले. बघा नाराजीचा सूर नेमका कोणा-कोणाकडे?