कल्याणमध्ये शिंदे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये जोरदार राडा
कल्याणमध्ये शिंदे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये जोरदार राडा झाला आहे. काही महिला याठिकाणी बाचाबाची करताना पहायला मिळत आहेत.
कल्याणमध्ये शिंदे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये जोरदार राडा झाला आहे. काही महिला याठिकाणी बाचाबाची करताना पहायला मिळत आहेत. एकनाथ शिंदे यांचा फोटो तिथून हटवण्याचं काम केल्याचं पहायला मिळालं. गेल्या अर्ध्या तासापासून शाखेत हा राडा सुरू आहे. एकनाथ शिंदे यांचे समर्थक आणि ठाकरे गटाचे शिवसैनिक आपापसांत भिडले आहेत. याचा व्हिडीओ समोर आला आहे.