Special Report | चिपी विमानतळावरुन श्रेयवादाची लढाई!
कोकणात राणे विरुद्ध शिवसेना या वादाचा नवा अंक सुरु झाला आहे. या नव्या वादावर चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरुन ठिणगी पडली आहे.
कोकणात राणे विरुद्ध शिवसेना या वादाचा नवा अंक सुरु झाला आहे. या नव्या वादावर चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरुन ठिणगी पडली आहे. चिपी विमानतळाचं उद्घाटन 9 ऑक्टोबरला होणार आहे. मात्र या उद्घाटनाच्या आधीच श्रेयवादाला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे येत्या 9 ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं उद्घाटन होणार आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे एकाच मंचावर येणार आहेत. राणेंची केंद्रीय मंत्रीपदी लागलेली वर्णी आणि जन आशीर्वाद यात्रेत राणेंना झालेली अटक या पार्श्वभूमीवर हे दोन्ही नेते पहिल्यांदाच एकाच मंचावर येणार असल्याने त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Published on: Sep 08, 2021 10:49 PM