पुण्यात शिंदे गट – ठाकरे गट आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये राडा अन् बाचाबाची
VIDEO | शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर पुण्यात शिंदे, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगानं काल शिवेसना पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण आणि नाव हे दोन्ही शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला. या निर्णयानंतर ठाकरे गटात एकच खळबळ उडाली. सर्वोच्च न्यायालयात याबाबतचा निर्णय बाकी असताना निवडणूक आयोगाने हा निकाल दिल्याने ठाकरे गटाची चिंता अधिकच वाढली. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला शिवसेनेचं नाव आणि चिन्ह बहाल केल्यानंतर ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचा संताप पुण्यात अनावर झाल्याचे पाहायला मिळाला. यावेळी पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमधील राडा सावरत त्यांच्यात समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण दोन्ही गटातील कार्यकर्ते मागे हटण्यास तयार नव्हते. दोन्ही गटाचे कार्यकर्ते एका विशेष कार्यक्रमासाठी पुणे पत्रकार संघाजवळ आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर शिंदे गटाचे कार्यकर्ते बाहेर आले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीनंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.