महायुतीच्या 4 जागांवर तोडगा निघाला?, कल्याण-ठाण्यातून कोण? संभाजीनगरमधून तिकीट कुणाला?

| Updated on: Apr 01, 2024 | 6:44 PM

महायुतीतील चार जागांच्या वाटपाचा तिढा सुटल्याची माहिती समोर येत आहे. संभाजीनगर, कल्याण, ठाणे आणि पालघर या चार जागांवरून शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रदीर्घ चर्चा करून या चारही जागांचा तिढा सोडला आहे.

गेल्या काही दिवसांपासून संभाजीनगर, कल्याण, ठाणे आणि पालघर या चार जागांवरून शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असताना अखेर महायुतीतील चार जागांच्या वाटपाचा तिढा सुटल्याची माहिती समोर येत आहे. महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीतील चर्चेनंतर तोडगा निघाला असून कल्याण आणि ठाण्याची जागा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला देण्यात आली आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे हे कल्याणमधून लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाण्यातून नरेश म्हस्के किंवा प्रताप सरनाईक यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. तर भाजपने संभाजीनगरवर दावा केला होता. मात्र, नंतर त्यांनी हा दावा सोडलाय. त्यामुळे शिंदे गट ही सीट लढवणार असून शिंदे गटाकडून संदीपान भुमरे संभाजीनगरमधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. यासोबत पालघरची जागा भाजप लढणार असल्याचे सांगितले जात आहे.

Published on: Apr 01, 2024 06:44 PM
मला संधी दिली तर प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी देणार, नीलेश लंके यांची घोषणा
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचा अपघात, पोलिसांच्या वाहनाची बसली धडक