पालकमंत्रिपदाचा वाद सुटता सुटेना! ध्वजारोहणाची यादी दोनदा बदलली, पुण्यात कोणाच्या हस्ते ध्वजारोहण?

| Updated on: Aug 11, 2023 | 4:27 PM

VIDEO | राज्यातील तीन पक्षाच्या सरकारमध्ये पालकमंत्रीपदाचा वाद सुरुच,15 ऑगस्टच्या ध्वजारोहणाची यादी दुसऱ्यांदा बदलली; पुणे शहरात ना अजित पवार ना चंद्रकांत पाटील मग कोण करणार ध्वजारोहण?

मुंबई, ११ ऑगस्ट २०२३ | राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पक्षांचे सरकार आहे. भाजप शिवसेनेचे सरकार असताना मंत्रिमंडळ झाला नव्हता, दरम्यान हा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची उत्सुकता असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सरकारमध्ये आला. अजित पवार यांच्यासह नऊ जण मंत्री झाले. परंतु वादामुळे पालकमंत्रीपदाचे वाटप अद्याप बाकी आहे. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यात कोणता पालकमंत्री ध्वजारोहण करणार यावरून वाद असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे १५ ऑगस्टच्या ध्वजारोहणाची यादी दोन वेळा बदलण्यात आली आहे. जुन्या यादीनुसार पुणे येथे चंद्राकांत पाटील ध्वजारोहण करणार होते. आता नवीन यादीनुसार चंद्रकांत पाटील रायगडमध्ये ध्वजारोहण करणार आहेत. पुण्यात राज्यपाल रमेश बैस ध्वजारोहण करणार आहे. यामुळे पुण्यात ना चंद्रकांत पाटील, ना अजित पवार असा तोडगा काढला गेला आहे. तर अमरावतीत छगन भुजबळ ध्वजारोहण करणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीकडून सुचवले गेले. परंतु हा निर्णय कायम राहिला. अजित पवार आता कोल्हापुरात ध्वजारोहण करणार आहे. रायगडसाठी आदिती तटकरे यांचा दावा होतो. परंतु त्यांना पालघर दिले गेले आहे.

Published on: Aug 11, 2023 04:27 PM
क्या बात है ! बीड-अहमदनगर मार्गाच्या रुंदीकरणात येणाऱ्या 100 वर्ष जुन्या झाडाचं रिप्लांटेशन
मुख्यमंत्री शिंदे आणि अजितदादा यांच्यात कोल्ड वॉर?, विजय वडेट्टीवार यांनी काय केला गौप्यस्फोट?