Special Report | ड्रग्ज प्रकरणानंतर नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात तपासयंत्रणेवरुन वाद

| Updated on: Dec 20, 2021 | 11:41 PM

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे तपास यंत्रणांना माझ्याविरोधात सूचना देत आहेत. त्यामुळे त्यांनी आता स्वत: तपास यंत्रणांचा ओएसडी बनावं आणि किरीट सोमय्या यांना या यंत्रणांचा प्रवक्ता बनवावं, असा टोला राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी लगावला आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे तपास यंत्रणांना माझ्याविरोधात सूचना देत आहेत. त्यामुळे त्यांनी आता स्वत: तपास यंत्रणांचा ओएसडी बनावं आणि किरीट सोमय्या यांना या यंत्रणांचा प्रवक्ता बनवावं, असा टोला राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी लगावला आहे. नवाब मलिक बीडमध्ये आहेत. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी थेट देवेंद्र फडणवीसांवरच हल्ला चढवला. फडणवीस तपास यंत्रणांना माझ्याविरोधात सूचना देत आहेत. मी काही कुणालाही घाबरणार नाही. भाजप ही महाराष्ट्रातील चोरों का बाजार आहे. तर किरीट सोमय्या या बाजारातील बाराती आहेत, असा घणाघाती हल्ला मलिक यांनी चढवला. दरम्यान, आपल्या घरावर ईडीची धाड पडणार असल्याचं मी ऐकलं. मी पाहुणे येण्याची वाट पाहत आहे. त्यांच्यासाठी चहा आणि बिस्किटं आणून ठेवली आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

Published on: Dec 20, 2021 11:16 PM
Aishwarya Rai Bachchan ED Inquiry | ऐश्वर्या राय बच्चनची 6 तास चालली ED चौकशी
Special Report | बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायचं ऐश्वर्य धोक्यात?