मराठा कार्यकर्ते अन् भुजबळ समर्थक आमने-सामने, 44 जणांवर गुन्हा दाखल; राड्याचं कारण काय?
येवल्यात मराठा आंदोलक आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाल्याचे काल पाहायला मिळाले. मनोज जरांगे पाटील येवल्यात शिवसृष्टीला भेट देण्यासाठी आले त्यावेळी मराठा आंदोलक आणि भुजबळांचे समर्थक आमनेसामने आले. याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे
येवला येथे मराठा कार्यकर्ते आणि मंत्री छगन भुजबळांच्या समर्थकांमध्ये झालेल्या राड्या प्रकरणात येवला शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तब्बल ४४ जणांवर येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २९ जाणांचे नाव निष्पन्न झालं आहे तर १५ अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हिडीओच्या माध्यमातून पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. शिवसृष्टीमध्ये मराठा कार्यकर्ते – भुजबळ समर्थक समोरासमोर आले होते त्यानंतर मोठा राडा झाल्याचा पाहायला मिळाले होते. या राड्यानंतर शिवसृष्टी परिसरात काही काळ तणावाच वातावरण निर्माण झालं होतं. मनोज जरांगे पाटील हे काल येवला दौऱ्यावर होते. मनोज जरांगे यांनी येवल्यात आल्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. यानंतर त्यांना येवल्यात शिवसृष्टी उभारण्यात आली असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे मनोज जरांगे पाटील शिवसृष्टी उभारलेल्या ठिकाणी शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी आले. मनोज जरांगे यांनी शिवसृष्टीला भेट दिल्यानंतर ते आपल्या सभास्थळाच्या दिशेला जात असताना अचानक मराठा कार्यकर्ते आणि मंत्री छगन भुजबळ यांचे समर्थक आमनेसामने आलेत.