रुपाली चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, दोघांचं शाब्दिक वॉर थेट बापापर्यंत…

| Updated on: Sep 19, 2024 | 4:33 PM

मुक्ताईनगरमधील आयोजित कार्यक्रमात रूपाली चाकणकर यांनी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या माणसाला दीड हजाराची किंमत कशी कळणार? असा सवाल करत रोहिणी खडसेंवर निशाणा साधला तर आमच्या वडिलांनी आमच्यासाठी कुठलाही मतदारसंघात ठेवला नाही आम्ही आंदोलनातून मोठे झालेलो आहोत, असे म्हटले.

Follow us on

स्वतःचं असं कर्तृत्व नसणाऱ्यांना वडिलांच्या नावावर सुरक्षित असलेला मतदारसंघ लढता आला नाही, असं वक्तव्य करत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. गेल्या काही दिवसांपासून रुपाली चाकणकर आणि रोहिणी खडसे यांच्या शाब्दिक आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, रूपाली चाकणकर यांना आमदारकीचे डोहाळे लागले आहे. त्यांनी आधी नगरसेवक होऊन दाखवावं, असं वक्तव्य करत रोहिणी खडसे यांनी रूपाली चाकणकरांवर टीका केली होती. या टीकेवर रूपाली चाकणकर यांच्याकडून पलटवार करण्यात आला आहे. ‘वडिलांमुळे सोन्याचा चमचा घेऊन स्वतःचं कर्तुत्व नसताना वडिलांच्या नावावर पद मिळवलं, त्यांना टीका करण्याचा अधिकार नसल्याचे म्हणत रूपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसेंना प्रत्युत्तर दिलंय.