‘आगामी काळात शिंदे गटात मोठा स्फोट होणार’, ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा

| Updated on: May 31, 2023 | 1:00 PM

VIDEO | 'मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे गटात मोठा असंतोष, ४ ते ५ मंत्र्यांची चलती बाकी...', ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल

मुंबई : शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर बरेच दिवस उलटून गेले. तरी देखील राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झालेलं नाही. तर ते लांबणीवर टाकण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारसह शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे गटात मोठा असंतोष आहे’. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये ४ ते ५ मंत्र्यांची चलती बाकिच्यांना किंमत नाही. तर आगामी काळात शिंदे गटात मोठा स्फोट होणार, असा दावाही विनायक राऊत यांनी केलाय. विनायक राऊत म्हणाले, शिंदे गटातील आमदार आणि खासदार यांच्यात मंत्रिमंडळ विस्तारावरून मोठा असंतोष आहे. स्वतःच्या गटात येण्यासाठी पन्नास खोके हे जे सूत्र लावलं होतं ते केवळ तोंडाला पानं पुसणारं होतं. ४ ते ५ मंत्र्यांची चलती आहे ती जर सोडली तर बाकी कोणालाही समाधानकारक कामं करता येत नाही. म्हणून त्याचा गौप्यस्फोट खासदार गजानन किर्तीकर यांच्या रूपाने झाला असल्याचे विनायक राऊत यांनी म्हटले.

Published on: May 31, 2023 01:00 PM