अजित पवार अन् सुप्रिया सुळेंमध्ये रक्षाबंधनालाही दुरावा, ताईंनी दादांना राखी बांधलीच नाही
रक्षाबंधनाच्या निमित्ताने खास फोटो समोर यायचा पण यावेळी सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना राखी बांधली नाही. राजकारणामुळे बहिण भावात कसा दुरावा आला हे रक्षाबंधनाच्या निमित्ताने स्पष्ट पाहायला मिळालं...दरम्यान, अजित पवार यांच्याकडून लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार सुरू आहे. यावरून सुप्रिया सुळेंनी त्यांना टोलाही लगावला.
राजकारणामुळे सुप्रिया सुळे आणि अजित पवार या बहीण-भावात कसं अंतर पडलं? हे रक्षाबंधनाच्या निमित्तानं समोर आलं. अजित पवार राखी बांधून घेण्यासाठी सुप्रिया सुळे यांच्याकडे आले नाहीत ना सुप्रिया सुळे दादांकडे गेल्या. अजित पवार म्हणाले मी मुंबईत आहे तर सुप्रिया सुळे म्हणाल्या मी नाशिकमध्ये आहे. सुप्रिया सुळे मुंबईत असतील तर राखी बांधून घेणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. मात्र मी नाशिकमध्ये आहे. कुणीही राखी बांधून घ्यायला आलं तर स्वागत करेन, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटल्याचे दिसले. अजित पवार जनसन्मान यात्रेसाठी मुंबईत होते. तर लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमातून ठिकठिकाणी अजित पवार यांनी लाडक्या बहिणींकडून राखी बांधून घेतली. तर सुप्रिया सुळे यांनी नाशिकमध्ये खासदार भास्कर भगरेंना राखी बांधली. हा राखी बांधतानाचा व्हिडीओ सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडियावर टाकला. तसंच नाशिकच्या दौऱ्यात सुप्रिया सुळेंनी शेतकऱ्यांनाही राखी बांधली.