Shahaji Bapu Patil : …तर शिवसैनिकांची अवलाद सांगणार नाही, शहाजीबापूंना कुणी दिलं ओपन चॅलेंज
सांगोल्यात शिवसेनेचे ११०० मतं आहेत. मी माझ्या जीवावर निवडून आलो आहे, तर शिवसेनेच्या जीवावर निवडून आलो नाही, असे शहाजी बापू यांनी म्हटलं होतं. यावरून युवासेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांनी सडकून टीका केली आहे. तर शहाजीबापू यांना त्यांनी खुलं आव्हानही दिलंय.
सोलापूर, ७ नोव्हेंबर २०२३ | सांगोल्यातील शिवसेनेबद्दल वक्तव्य करणाऱ्या सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांना ठाकरे गटाच्या युवा सेनेकडून ओपन चॅलेंज देण्यात आलं आहे. सांगोल्यात शिवसेनेचे ११०० मतं आहेत. मी माझ्या जीवावर निवडून आलो आहे, तर शिवसेनेच्या जीवावर निवडून आलो नाही, असे शहाजी बापू यांनी म्हटलं होतं. यावरून युवासेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांनी सडकून टीका केली आहे. ‘शहाजी बापू तुम्ही विधानसभा लढवून दाखवा, तुम्हाला आस्मान नाही दाखवले तर शिवसैनिकांची अवलाद नाही सांगणार’, असे म्हणत गणेश इंगळे यांनी खुलं आव्हानच दिलं आहे. काल झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील शहाजी बापूंच्या विजयानंतर ठाकरे गटातर्फे हे आव्हान देण्यात आलं आहे. तर युवासेनेने दिलेल्या आव्हानामुळे तुम्ही मुंबईतील दसरा मेळाव्याला जाऊ शकला नाहीत, असे म्हणत खोचक निशाणाही शहाजीबापूंवर साधला आहे.