Bachchu Kadu यांच्याकडून पुनरूच्चार; म्हणाले, ‘…म्हणूनच गुवाहाटीला गेलो’
VIDEO | दिव्यांग मंत्रालय कसं मिळालं? एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला जाण्यापूर्वी भारतीय जनता पक्षासोबत नेमकं काय ठरलं होतं? आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा गिरवलं गुवाहाटी पुराण, बघा काय म्हटले?
ठाणे, ३१ ऑगस्ट २०२३ | दिव्यांग कल्याण दिव्यांगांच्या दारी अभियानाला आज पालघरमध्ये सुरुवात झाली असून आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते दिव्यांगांना विविध कागदपत्रांच वाटप करण्यात आलं . यावेळी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात हजारो दिव्यांगांनी मोठी गर्दी केली असून शासनाच्या सर्व योजनांचा लाभ दिवांग्यांनी घ्यावा अस आवाहन यावेळी बच्चू कडू यांच्याकडून करण्यात आल. हे अभियान जास्तीत जास्त दिव्यांगांपर्यंत पोहचवण्यासाठी या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आल्याच बच्चू कडू यांच्याकडून सांगण्यात आलं. दिव्यांगांसाठीच आपण गुवाहाटीला गेल्याचा पुनरुच्चार यावेळी बच्चू कडू यांनी केला. तर यावेळी अजित पवार यांनी सही केलेल्या फाईल थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या टेबलवर आता जाणार नसून ते आता देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत एकनाथ शिंदे यांच्या सहीसाठी पुढे जाणार असल्याच्या प्रश्नावर बच्चू कडू यांनी मिश्किल टिपणी केली. ते म्हणाले, तीन पक्षांच सरकार आहे त्यामुळे समन्वय साधण्यासाठी असा निर्णय घेण्यात आला असावा असा दावा यावेळी बच्चू कडू यांनी केला