अबब! झेंडू, पिवळा झेंडू, शेवंती…मागच्या वर्षीच्या तुलनेत एका क्रेटची किंमत तर पहा

| Updated on: Nov 11, 2023 | 4:47 PM

उद्या लक्ष्मी पूजन आणि नरक चतुर्दशी आहे. या खास दिवसासाठी खरेदी करण्यासाठी लोकं लोक घराबाहेर पडलेत. जवळपास सगळ्याच बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी आहे. नाशिकच्या बाजारपेठेत झेंडू घेण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केलीये. मागच्या वर्षीच्या तुलनेत झेंडूच्या फुलांची किंमत यावर्षी जास्त आहे पण तरीही लोकांचा उत्साह खूप आहे.

Follow us on

नाशिक, 11 नोव्हेंबर 2023 | दिवाळी सणाच्या वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची बाजारपेठेत लगबग सुरु झालीये. उद्या लक्ष्मी पूजन आणि नरक चतुर्दशी आहे. या खास दिवसासाठी खरेदी करण्यासाठी लोकं लोक घराबाहेर पडलेत. जवळपास सगळ्याच बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी आहे. नाशिकच्या बाजारपेठेत झेंडू घेण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केलीये. मागच्या वर्षीच्या तुलनेत झेंडूच्या फुलांची किंमत यावर्षी जास्त आहे पण तरीही लोकांचा उत्साह खूप आहे. नाशिकच्या बाजारपेठेत झेंडूची फुले, शेवंतीची फुले, पिवळा झेंडू मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालाय. फुलांच्या किंमतींत प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झालीये. गेल्या वर्षी फुलांची एक क्रेट 50 ते 60 रुपयांना मिळत होती तर यंदा हीच किंमत 150 रुपये आहे.