रस्ता माझ्या मालकीचा…. स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?

| Updated on: Mar 19, 2024 | 12:48 PM

डॉक्टरने अशा दुःखद प्रसंगी माणुसकीला तिलांजली दिल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांसह ग्रामस्थांनी बंद केलेल्या गेटसमोरच कोल्हेंच्या चितेला अग्नी देत अंत्यसंस्कार केले. ग्रामस्थांवर अशी रस्त्यातच अंत्यविधी करण्याची दुर्दैवी वेळ आणणाऱ्या डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा गावकऱ्यांनी केलीय

बुलढाणा, १९ मार्च २०२४ : चिखली तालुक्यातील धोडप गावाच्या वेशीपासून स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता आपल्या मालकीचा असल्याचे सांगत गावातील एका डॉक्टरने वेशीवरच लोखंडी गेट उभारून रस्ता बंद केला. त्यामुळे काल गावातीलच श्रीराम कोल्हे यांचे निधन झाल्याने अंत्यविधीचा प्रश्न उद्भवला. डॉक्टरने अशा दुःखद प्रसंगी माणुसकीला तिलांजली दिल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांसह ग्रामस्थांनी बंद केलेल्या गेटसमोरच कोल्हेंच्या चितेला अग्नी देत अंत्यसंस्कार केले. ग्रामस्थांवर अशी रस्त्यातच अंत्यविधी करण्याची दुर्दैवी वेळ आणणाऱ्या डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा गावकऱ्यांनी केलीय. धोडप येथील शेतकरी श्रीराम कोल्हे यांचे काल हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. यानंतर वेशीतून अंत्ययात्रा घेऊन जाताना गावातील डॉ. गणेश कोल्हे यांनी गेटला कुलूप ठोकून रस्ता अडवल्याने ग्रामस्थांना संताप अनावर झाला. तब्बल दोन तास मृतदेह रस्त्यावर पडून होता. तरीही स्मशानभूमीत जायला रस्ता नसल्याने पोलिसांनी डॉक्टरला समजावण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचेही ऐकले नाही. शेवटी ग्रामस्थांनी पोलिसांच्या उपस्थितीत गेट समोर रस्त्यावरच अंत्यासंस्कार केले.

Published on: Mar 19, 2024 12:48 PM
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शाब्दिक फायरिंग, सुनेत्रा पवार जिंकत नाही; शिवतारेंचा दावा
खडसेंनी वयाचं भाव ठेवावं, भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला जोरदार पलटवार?