मुंबई : आधी सिंचन घोटाळ्यावरुन, अजित पवारांना(Ajit Pawar) इशारा आणि आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांकडे(Rohit Pawar) मोर्चा वळवलाय. भाजपच्या मोहित कंबोज( BJP leader Mohit Kamboj) यांनी पुन्हा खळबळ उडवण्याचा प्रयत्न केलाय. बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनीसंदर्भात(Baramati Agro Limited Company) मी सध्या अभ्यास करत आहे. त्यासंदर्भातली संपूर्ण माहिती मी लवकरच बाहेर घेऊन येईन. बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनीच्या यशाचं रहस्य काय, याचा अभ्यास करुन मी तरुणांसमोर मांडणार. ज्यामुळं त्यांना भरपूर फायदा होईल. म्हणजेच बारामती अॅग्रो कंपनीवरुन, काही तरी घोटाळा बाहेर काढणार असा इशाराच मोहित कंबोज यांनी दिलाय.
रोहित पवार बारामती ॲग्रो कंपनीचे सीईओ आहेत. तर त्यांचे वडील राजेंद्र पवार संचालक आहेत. आता मोहित कंबोज यांच्या ट्विट नंतर रोहित पवारांनी प्रतिक्रिया देत, कंबोज यांच्यावरच बँक घोटाळ्याचा आरोप केलाय. ओव्हरसिज बँकेत 52 कोटींच्या घोटाळ्यात कंबोज यांचं नाव आहे. त्यामुळं त्यांना महत्व देत नाही, असं रोहित पवार म्हणालेत.
ऑगस्टलाच कंबोज यांनी पुन्हा सिंचन घोटाळ्याची फाईल उघडण्याची मागणी केली होती..आणि मोठा राष्ट्रवादीचा नेता मलिक, देशमुखांना भेटणार असं ट्विट केलं होतं..आता रोहित पवारांचीही फाईल उघडण्याच्या प्रयत्नात असल्याचं कंबोज सांगू पाहतायत. याआधी किरीट सोमय्या महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे हात धुवून लागले होते. पण आता मोहित कंबोज यांनी मोर्चा सांभाळल्याचं दिसतंय..अर्थात जे 2 ट्विट कंबोज यांनी केलेत, त्याचा पत्रकार परिषदेत कसा खुलासा करतात हे पाहणं महत्वाचं असेल.