Donald Trump Tariff : ट्रम्प टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननंही वटारले डोळे

Donald Trump Tariff : ट्रम्प टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननंही वटारले डोळे

| Updated on: Apr 08, 2025 | 6:20 PM

चीनवर अतिरिक्त 50 टक्के टॅरिफ लावण्याचा अमेरिकेने इशारा दिला होता. अमेरिका आणि चीन एकमेकांवर 34 टक्के टॅरिफ लावल्याने व्यापार युद्ध भडकले आहे.

अमेरिकेच्या टॅरिफच्या इशानंतर चीननेही डोळे वटारले आहेत. अमेरिकेच्या टॅरिफ ब्लॅकमेलला घाबरणार नाही असं म्हणत चीनने प्रत्युत्तर दिलेलं आहे. अमेरिका आणि चीनने एकमेकांवर 34 टक्के टॅरिफ लावल्याने व्यापार युद्ध भडकले आहे. अमेरिकेच्या टॅरिफ ब्लॅकमेलला घाबरणार नाही असं म्हणत चीनने डोळे वटारले आहेत. 8 एप्रिलपर्यंत चीनने आयात शुल्क कमी केलं नाही तर अतिरिक्त 50 टक्के टॅरिफ लावण्याची अमेरिकेने धमकी दिली. या धमकीला न जुमानता चीनने प्रत्युत्तर दिले. चीनविरुद्ध शुल्क वाढवण्याची अमेरिकेची धमकी ही एक चूक आहे. यामुळे अमेरिकेची ब्लॅकमेलिंगची सवय पुन्हा एकदा स्पष्ट होते, असं चीनने म्हटले. आमच्या कायदेशीर हक्कांचे आणि हितांचे रक्षण करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा उलट इशाराही चीनने अमेरिकेला दिला आहे. चीन-अमेरिकेतल्या तणावामुळे चीनने भारताशी संबंध सुधारण्यावर भर दिला. अमेरिकेनं लावलेले 34 टक्के आयात शुल्क टाळण्यासाठी चीननं भारतीय बाजारपेठेकडे लक्ष वळवलं आहे. भारतातून चीनमध्ये आयात वाढवण्याचं चीनच्या सरकारने लक्ष ठेवले आहे. भारतातील चीनचे राजदूत शू फेंग यांच्याकडून व्यापार वाढवण्याबाबत भाष्य करण्यात आले. ग्लोबल टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत शू फेंग यांनी हे वक्तव्य केले. जिनपिंग यांनी राष्ट्रपती मुर्मूंना भारत-चीनमधल्या व्यापाराबाबत संदेश पाठवला. लवकरच भारत आणि चीनमध्ये व्यापाराबाबत चर्चा होण्याचेही संकेत त्यांनी दिले आहेत.

Published on: Apr 08, 2025 06:20 PM
विठुरायाकडून धनवर्षाव… अख्ख्या गावाची सफाई करणाऱ्या महिलेला लॉटरी अन् रातोरात मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्…
Phule Movie : फुले चित्रपटातील ‘त्या’ सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवे यांची मागणी काय?