Sanjay Raut : … लोकशाही मानत नाहीत का? संजय राऊत यांचा सरसंघचालक मोहन भागवत यांना थेट सवाल
VIDEO | मोहन भागवत लोकशाही मानत नाहीत का? या देशात भिन्न विचाराचे लोक येऊ नये का? असा सवाल करत संजय राऊत यांनी मोहन भागवत यांच्यावर सडकून टीका केली आहे. मोहन भागवत यांना लोकशाहीचे आम्ही संरक्षक मानतो. या देशात भिन्न विचाराचे लोकांनी एकत्र येऊ नये का?
मुंबई, २४ ऑक्टोबर २०२३ | सरसंघचालक मोहन भागवत लोकशाही मानत नाहीत का? या देशात भिन्न विचाराचे लोक येऊ नये का? असा सवाल करत संजय राऊत यांनी मोहन भागवत यांच्यावर सडकून टीका केली आहे. मोहन भागवत यांना लोकशाहीचे आम्ही संरक्षक मानतो. या देशात भिन्न विचाराचे लोकांनी एकत्र येऊ नये का? मी मोहनराव भागवतांना एक सांगू इच्छितो की, बाळासाहेब देवरस सरसंघचालक हे आणीबाणीच्या काळात तुरुंगात होते. तेव्हा देखील भिन्न विचाराचे लोक एकत्र आले. त्यावेळी भारतीय जनता पक्ष देखील होता. भिन्न विचारांच्या लोकांनी एकत्र येऊन भाजप स्थापना केली. त्यांनी हुकूमशाहीचा पराभव केला. हे मोहन भागवत यांना सांगण्याची गरज नाही. बहुदा त्यांना इतिहास माहीत असावा, असे संजय राऊत म्हणाले. जर हा इतिहास माहित नसेल तर अडवाणींच्या आणीबाणीच्या काळात ते तुरुंगात होते. त्यांनी त्यांच्या पुस्तकात सर्व घटना उल्लेख केलेला आहे. ते पुस्तक मी मोहनराव भागवत यांना पाठवेल, असंही म्हणत राऊत यांनी खोचक भाष्य केले.