खारघरवरुन वाद कायम, महाराष्ट्र भूषण सन्मानावेळी ‘हाजारो श्री सेवक पाण्याशिवाय तडफडून मेले’, कुणाचा दावा, बघा स्पेशल रिपोर्ट
VIDEO | महाराष्ट्र भूषण सन्मान सोहळ्याला काही दिवस उलटून गेल्यानंतरही खारघरवरून वाद कायम, विरोधक-सत्ताधाऱ्यामंध्ये आरोप-प्रत्यारोप, बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. हा सोहळा नवीमुंबईच्या खारघर येथील मैदानात झाला. या सोहळ्याला काही दिवस उलटून गेल्यानंतरही खारघरवरून वाद कायम आहे. या सन्मानावेळी उष्माघाताने मृत्यू पावलेल्या लोकांच्या पोटात अन्न आणि पाणी देखील नव्हतं, असा आरोप संजय राऊत यांनी केला तर नियोजनामध्ये कोणताही गोंधळ झाला नसल्याचे अपघात वारीत सुद्धा घडतात त्यामुळे यावरून राजकारण करू नये, असं सरकारने म्हटले आहे. तर या कार्यक्रमाचे काही व्हिडीओ व्हायरल होताना दिसताय, ज्यामध्ये चेंगराचेंगरी झाल्याचा प्रकार झाल्याचे समोर आले तर दुसरीकडे पोलिस कर्मचारी श्री सेवकांना केळी वाटप करताना दिसताय. दरम्यान कार्यक्रमाची वेळ दुपारीच का निवडली असा वाद राज्यात सुरूये. ज्या दिवशी ज्यावेळेत कार्यक्रम झाला ती वेळा स्वतः आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी दिल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. तर आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या अनुयायांनी दिलेल्या वेळेनुसार हा कार्यक्रम घेण्यात आल्याचे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे, बघा यासंदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट