हिंगोलीत रांगोळीने साकारली बाबासाहेबांची प्रतिमा

| Updated on: Apr 14, 2022 | 1:58 PM

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांच्या जयंतीनिमित्त हिंगोलीत रांगोळीतून त्यांची प्रतिमा साकारण्यात आली. आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मिळून ही रांगोळी काढली.

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हिंगोलीत रांगोळीतून त्यांची प्रतिमा साकारण्यात आली. गेले दोन वर्ष देशासह राज्यावर कोरोनाचे सावट होते. त्यामुळे जयंती साजरी करण्यासाठी काही मर्यादा आल्या, मात्र आता कोरोनाचे संकट कमी झाले असून, राज्यातील सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे आज मोठ्या धुमधडाक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मिळून ही रांगोळी काढली.