Special Report | महाराष्ट्रातील ‘या’ मंदिरात तोकडे कपडे घातल्यास ‘नो एन्ट्री’, काय आहेत अटी?

| Updated on: May 30, 2023 | 6:56 AM

VIDEO | राज्यात देवदर्शनाला जाताय? मग माहिती करून घ्या, कोणत्या ७ मंदिरांमध्ये ड्रेसकोड लागू झालाय

मुंबई : राज्यातील अनेक मंदिरांमध्ये आता ड्रेसकोड लागू झालाय. मंदिर प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या या ड्रेसकोडच्या नियमांचं स्वागत करण्यात येतंय तर काही जणांचा विरोध होतोय. राज्यातील कोणत्या मंदिरांमध्ये ड्रेसकोड लागू झालाय? कोणत्या अटी लादण्यात आलाय. यापूर्वी तुळाजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात लोकड्या कपड्याबाबत फर्मान निघालं होतं. मात्र यानंतर ट्रस्टनेच तो निर्णय मागे घेतला. मात्र राज्यातील अनेक मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आलाय. तोकडे कपडे घातल्यास या मंदिरात नो एन्ट्री असणार आहे. पुण्यातील वाघाली येथील वाघेश्वर मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आलाय. ट्रस्टने घेतलेल्या निर्णयानुसार, महिलांना जर वन पीस, शॉर्ट स्कर्ट, पॅन्ट परिधान केली तर प्रवेश नाही. नागपूरच्या धंतोलीच्या गोपालकृष्ण मंदिरात तोकडे कपडे कुणी घातल्यास ओढणी किंवा पंचा दिला जाईल. बेलोरी सावनेरच्या पंचमुखी मारूती मंदिरात तोकड्या कपड्यांना प्रवेश नाही. नागपूरच्या कान्होली बारा बृहस्पती मंदिर, नागपूर हिलटॉप दुर्गामाता मंदिर, जळगाव अमळनेर मंगळग्रह मंदिर, तर नाशिकच्या वणी सप्तश्रृंगी मंदिरात ड्रेस कोड लागू करण्याची शक्यता आहे. प्रशासनाने अद्याप निर्णय जाहीर केला नाही.

Published on: May 30, 2023 06:56 AM
आठ वर्षांपासून वाट बघतोय नव्हे तर खड्डा बुजवतोय ‘रिक्षावाला’, कोण आहे हा अवलिया?
“अनिल परब मग ते साडेदहा कोटी रुपये कुठून आले?” किरीट सोमय्या यांचा इशारा; म्हणाले, “हिशोब तर घेणारच!”