Maharashtra Fort : न्यू इयर, थर्टी फस्टच्या पार्टीसाठी गड-किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड अन्…
न्यू इयर जवळ येत असल्याने तो जल्लोषात साजरा करण्यासाठी अनेकांचा कल हा गड-किल्ल्यांकडे असल्याचे पाहायला मिळते. मात्र या ठिकाणी काही जणांकडून दारू पार्टी हुल्लडबाजी केली जाते. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
अवघ्या काही दिवसांत आपण नवीन वर्षात पदार्पण करणार आहोत. तर २५ डिसेंबर रोजी नाताळ साजरा करण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वच जण सज्ज झाले आहे. अशातच न्यू इयर जवळ येत असल्याने तो जल्लोषात साजरा करण्यासाठी अनेकांचा कल हा गड-किल्ल्यांकडे असल्याचे पाहायला मिळते. मात्र या ठिकाणी काही जणांकडून दारू पार्टी हुल्लडबाजी केली जाते. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले हे राज्याच्या सुवर्ण इतिहासाची साक्ष आहेत. त्यांचे पावित्र्य राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य तसेच जबाबदार आहे. अशा पवित्र ठिकाणी जर पावित्र्य राखले गेले नाहीतर आता मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. जर कोणीही गड-किल्ल्यांवर दारू पार्टी केली. तर, त्याला कठोर शिक्षा केली जाणार आहे. तसेच १ लाख रुपयांचा दंडदेखील ठोठवला जाणार आहे. गड- किल्ल्यांचं पावित्र्य राखण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
गड-किल्ले आपला सांस्कृतिक वारसा आहेत. त्यांना संरक्षित करण्यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचललं आहे. सरकारच्या या निर्णयानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी एक पोस्ट करून सरकारचे अभिनंदन केले आहे. ‘गड-किल्ले आणि आपला सांस्कृतिक वारसा संरक्षित करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय ! प्राचीन स्मारकांवर दारू पिणाऱ्यांसंदर्भात सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. यापुढे गड-किल्ल्यांवर अशा गैरकृत्यांसाठी १ लाख रुपये दंड आणि शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.हा निर्णय ऐतिहासिक स्थळांचे रक्षण आणि त्यांचे पावित्र्य राखण्यासाठी मोलाचा ठरेल. आता फक्त कायदा नव्हे, तर त्याची काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. तसेच, प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की आपण ऐतिहासिक वारसा भावी पिढ्यांसाठी जतन करू गड किल्ले स्वच्छ, सुरक्षित आणि पवित्र ठेवू’, असे राजेंनी म्हटले आहे.