VIDEO : Jalna | जालन्यात चालक-वाहक संपावर ठाम, 210 बसेस आगरातच उभ्या
ऐन दिवाळीत सुरू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर सरकारने तोडगा काढूनही आंदोलनाची धार कमी झालेली नाही. सरकारच्या आवाहनानंतर काही कर्मचारी कामावर आले. मात्र, आंदोलकांच्या दबावापुढे त्यांचे काहीही चालत नसून नाहीये. आजही जालन्यात चालक-वाहक संपावर ठाम आहेत.
ऐन दिवाळीत सुरू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर सरकारने तोडगा काढूनही आंदोलनाची धार कमी झालेली नाही. सरकारच्या आवाहनानंतर काही कर्मचारी कामावर आले. मात्र, आंदोलकांच्या दबावापुढे त्यांचे काहीही चालत नसून नाहीये. आजही जालन्यात चालक-वाहक संपावर ठाम आहेत. 210 बसेस आगरातच उभ्या आहेत. यामुळे प्रवाश्यांचे मात्र हाल होत आहेत. एसटी आंदोलन आता चिघळले असून, त्यात फूट पडलेली पाहायला मिळते आहे. त्यामुळे राज्यातल्या अनेक भागातील कर्मचारी सरकारने केलेली वेतनवाढ मान्य करत कामावर येताना दिसत आहेत. नाशिक जिल्ह्यात तर कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलील अधीक्षक सचिन पाटील यांनी संरक्षण देणार असल्याचे म्हटले आहे.