BMC | मुंबईत ड्रोनच्या सहाय्याने जनतूनाशक फवारणी, Video पाहाच…….
डेंग्यू आणि मलेरियाच्या अळ्यांची उत्पत्ती ठिकाणं शोधून तिथे ड्रोनच्या सहाय्याने मुंबई महापालिकेच्या वतीने जंतूनाशक फवारणी करण्यात येत आहे. मुंबईच्या धोबीघाट परिसरात अशा प्रकारची औषध फवारणी करण्यात आली आहे.
डेंग्यू आणि मलेरियाच्या अळ्यांची उत्पत्ती ठिकाणं शोधून तिथे ड्रोनच्या सहाय्याने मुंबई महापालिकेच्या वतीने जंतूनाशक फवारणी करण्यात येत आहे. मुंबईच्या धोबीघाट परिसरात अशा प्रकारची औषध फवारणी करण्यात आली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वत: या जंतूनाशक फवारणीची पाहणी केली आहे.
कोरोनाचं संकट कमी होतं ना होतं तोच आता मुंबईत डेंग्यू आणि मलेरियाची साथ आली आहे. मुंबईत ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण आढळले असून त्यामुळे पालिकेतील रुग्णालये रुग्णांनी भरून गेली आहेत. मुंबईत कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्यानंतर आता साथीच्या आजारांचा धोका वाढत आहे. बदलते वातावरण आणि पाऊस या संसर्गासाठी पोषक ठरत आहे. त्यामुळे मुंबईकरांनी योग्य खबरदारी घेऊन वेळीच वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. ऑगस्ट महिन्यात मुंबई शहर आणि उपनगरांत मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण वाढल्याचे दिसून आले आहे.