महाराष्ट्रच नव्हे तर देशातल्या अनेक राज्यांच्या वेशीवर दुष्काळाचं सावाट, राज्यात कुठं बिकट स्थिती?
tv9 Special Report | यंदा देशाचा मोठा भूभाग दुष्काळ होरपळण्याचे भाकीत, १२० सालानंतर यंदाचा ऑगस्ट महिना सर्वाधिक कोरडा गेल्याची नोंद; महाराष्ट्रात कुठं आहे भीषण वास्तव?
मुंबई, ३१ ऑगस्ट २०२३ | महाराष्ट्रच नव्हे तर देशातल्या अनेक राज्यांच्या वेशीवर दुष्काळाचं संकट येवून ठेपलंय. १२० सालानंतर यंदाचा ऑगस्ट महिना सर्वाधिक कोरडा गेल्याची नोंद झालीय. याआधी १९०१ सालात ऑगस्ट महिना सर्वाधिक कमी पर्जन्यमानाचा होता., त्यानंतर यंदा तशी स्थिती निर्माण होण्याची स्थिती आहे. यंदा देशाचा मोठा भूभाग दुष्काळ होरपळण्याचे भाकीत वर्तवले जात आहेत. जर महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं. तर ऑगस्ट महिन्यात सरासरीहून ७१ टक्के कमी पाऊस झालाय. ३२९ महसूल मंडलात गेल्या महिन्याभरात पावसाचा ठिपूसही पडलेला नाही, यावरुन जर आगामी काळात चित्र नाही बदललं, तर भविष्यात दुष्काळाची छाया दिसू लागलीय. महाराष्ट्राबरोबरच झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, पूर्व उत्तर प्रदेश, मणिपूर, अरुणाचल, आसाम, लडाख, हिमाचल आणि कर्नाटकच्या काही भागात दुष्काळाची तीव्रता अधिक दिसू शकते. महाराष्ट्र बघितला तर कोकण वगळता नाशिक, धुळे, नगर, सोलापूर, जळगाव, नंदुरबार, सांगली, सातारा, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलडाणा, बीड, जालना, लातूर, परभणी, हिंगोली आणि औरंगाबाद या जिल्ह्यात दुष्काळस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.