ड्रग्ज माफिया ललित पाटील याला अखेर अटक, तोंड कोणाची बंद? देवेंद्र फडणवीस अन् सुषमा अंधारे आमने-सामने
tv9 marathi Special Report | ड्रग्ज माफिया ललित पाटील याला अटक झाली आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आमने-सामने. ललितच्या चौकशीतून अनेकांचे संबंध बाहेर येतील आणि बोलणाऱ्यांची तोंड बंद होतील, फडणवीसांच्या टीकेवर अंधारे यांचा हल्लाबोल
मुंबई, २० ऑक्टोबर २०२३ | ड्रग्ज माफिया ललित पाटील याला अटक झाली आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आमने-सामने आलेत. ललितच्या चौकशीतून अनेकांचे संबंध बाहेर येतील आणि बोलणाऱ्यांची तोंड बंद होतील असे देवेंद्र फडणवीस म्हणाले तर यावर सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलंय. यावेळी सुषमा अंधारे भावूक झाल्यात. सुषमा अंधारे म्हणाल्या हा इशारा आहे की धमकी, तोंड बंद करणार म्हणजे मला संपवणार की अडकवणार? असा सवालच सुषमा अंधारे यांनी केला. येरवड्याच्या जेलमध्ये असताना तब्येत बिघडल्याने ९ महिने पुण्यातील ससूनमध्ये ललित पाटील उपचार घेत होता. इथूनच ड्रग्ज रॅकेट चालवत होता तर तो या ठिकाणाहूनच फरार झाला. यानंतरच सुषमा अंधारे यांच्यासह रविंद्र धंगेकर हे दादा भुसे, शंभुराज देसाई यांच्यावर टीकास्त्र सोडताय. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट