Nashik Video : मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, ‘हॅप्पी होली’ म्हणत दिलं पेटवून अन्…
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या प्रकारानंतर बस स्थानकं किती असुरक्षित आहे हे समोर आले होते. त्यातच नाशिकच्या ठक्कर बाजार बस स्थानकात धक्कादायक प्रकार घडल्याने बस स्थानकं असुरक्षित असल्याचे पुन्हा समोर आले आहे.
नाशिकमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या ठक्कर बाजार बस स्थानकात मद्यपीकडून स्वच्छता कर्मचाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मद्यपीने स्वच्छता कर्मचाऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकलं. इतकंच नाहीतर मद्यपीने स्वच्छता कर्मचाऱ्याला हॅपी होली म्हणून थेट पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. मद्यपीला परत इथे येऊ नको म्हटल्याचा राग आल्याने त्याने हे धक्कादायक कृत्य केल्याची माहिती मिळतेय. तर स्वच्छता कर्मचाऱ्याला पेटवणारा मद्यपी शुभम जगताप हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. नाशिक ठक्कर बस स्थानकात सीसीटीव्ही ऑपरेटर नसल्याने या प्रकरणात तपासाला अडथळा येत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या धक्कादायक घटनेत स्वच्छता कर्मचारी विजय गेहलोत 60 टक्के भाजल्याची माहिती मिळतेय.
Published on: Mar 22, 2025 12:49 PM